whatsapp web 
विज्ञान-तंत्र

WhatsApp Web साठी नवं फिचर; फेस आयडी, फिंगरप्रिंट पुरवणार अधिक सुरक्षा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- फेसबुकच्या मालकीच्या असणाऱ्या व्हॉट्सऍपने आपल्या यूजर्संना चांगला अनुभव देण्यासाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. गेल्या काही दिवसांत व्हॉट्सऍपने आणलेल्या सेक्युरिटी पॉलिसीमुळे बरीच चर्चा होत आहे. त्यातच कंपनीने आपल्या यूजर्ससाठी नवं अपडेट आणलं आहे. ही नवे अपडेट WhatsApp Web साठी असून डेस्कटॉप लॉगईनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

डेस्कटॉप लॉगईन करताना यापूर्वी QR Code चा वापर केला जायचा, पण आता युजर्संना फेस प्रिंट किंवा फिंगरप्रिंट अनलॉकचा वापर करावा लागणार असल्याची माहिती व्हॉट्सअॅपकडून देण्यात आली आहे. हे नवे फिचर पुढच्या काही आठवड्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीने डेस्कटॉप युजर्संना आणखी सुरक्षित अनुभव देण्यासाठी आणखी एक स्तर अॅड केला आहे. 

व्हॉट्सऍप सुरु केल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या तीन डॉटवर क्लिककरुन सेटिंग्ज मध्ये जावं लागेल. त्यात व्हॉट्सऍप वेबवर क्लिक करा. तिथे Link a Device पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनला फॉलो करा. त्यानंतर तुम्हाला WhatsApp Web वापरता येईल. 

व्हॉट्सऍप येत्या काही दिवसामध्ये आपल्या युजर्ससाठी मल्टी डिवाइस लॉगइन फीचरही आणणार आहे. यामुळे तुम्हाला एका वेळी अनेक डेस्कटॉपवर व्हॉट्सऍप सुरु करता येणार आहे. सध्या युजर्संना एकाच डिवाईसवर लॉगईन करण्याची सुविधा आहे. व्हॉट्सऍप हे फिचर कधी आणेल याबाबत निश्चित माहिती नाही. 

युझर्सचा डेटा धोक्यात; Telegram बनलं हॅकर्सचं नवं हत्यार

दरम्यान, व्हॉट्सऍप सध्या बँकपूटवर आले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी नवी सेक्युरिटी पॉलिसी आणली आहे. यामध्ये व्हॉट्सऍप यूजर्सचा डाटा फेसबुकसाठी सुद्धा वापरला जाणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे जगभरातून टीकेचा सूर उमटला होता. त्यामुळे कंपनीला सेक्युरिटी पॉलिसी स्वीकारण्याची तारीख पुढे ढकलावी लागली होती. या पार्श्वभूमीवर कंपनीने एक सुरक्षा फिचर आणलं आहे. ज्यात यूजर्संना WhatsApp Web वापरताना जास्तीची सुरक्षा मिळणार आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT